संस्थानाविषयी

श्रीगणेश
 
सामाजिक नाळ जोडणारा गावाचा कैवारी  
|| श्री गणेशाय नम:||
ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः । भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ।
स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाग्‍ँसस्तनूभिः । व्यशेम देवहितं यदायूः || १||
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः । स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ।
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः । स्वस्ति नो वृहस्पतिर्दधातु ॥२||
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

 

शेतजमीन,भातशेती असणारे ठाणे जिल्यातील डोंबिवली हे छोटेसे खेडे होते.१९२२ च्या सुमारास काही ग्रामस्थाना गराच्या शुभकार्याची पत्रिका ठेवण्यासाठी गावात गणेश किंवा गावाबाहेर मारुतीरायाचे मंदिर नाही याची प्रकर्षाने जाणीव झाली.मग चर्चा,बैठका यातून ग्रामस्थानी एकत्र येऊन सर्वांच्या सहकार्याने २२ मे १९२४ रोजी श्री गणेशाची स्थापना छोट्याशा मंदिरात केली. कालांतराने याचे हेतूने मारुती व श्री गुरुदत्तात्रेय यांची स्थापना झाली.पण ती छोटेखानी वेगवेगळ्या मंदिरात.१९२६-२७ मध्ये मंदिराचे पहिले विश्वस्त मांडला स्थापन झाले.१९३६ मध्ये मंदिराची घटना तयार झाली.सुशिक्षित मंडळींनी विचारविनिमय करून त्यात 'हे मंदिर सर्व जातीजमातींसाठी खुले असेल' हे स्पष्ट केले आहे. त्यावेळी मासिक उत्पन्न केवळ दोन रुपये होते.
 
पौरोहित्य करणाऱ्या महिला हा आज कॊतुकाचा विषय असला तरी १९३० मध्ये मंदिराचे पौरोहित्य करण्याचा मान अंबूबाई गोडबोले यांना मिळाला होता. त्यांनी काही वर्षे ही सेवा केली. तुटपुंज्या वेतनातून काही रक्कम जमा करून मंदिरातील वडाभोवती पार बांधला.आज जो पार आपण पाहतो तो त्यांच्या त्यागाचे प्रतीक आहे. पण याची पूर्वपीठिका मात्र आपल्याला माहीत नाही.
 
हा वड ९० वर्षांहून अधिक वृद्ध आहे.१९४२ ला गावाच्या गरजेतून या मंदिरात 'क्रियाकर्माची'सोया सुरु झाली.ती आजवर चालू आहे. १९५० नंतर मंदिराच्या गाभार्यात परवाच कीर्तनाद्वारे ज्ञानयज्ञ सुरु झाला.तोही आज चालूय आहे. पण यापूर्वीची पद्धत वेगळी होती. ही मंडळी प्रभोधन करत व त्या बदल्यात मंदिराला रोख रक्कम देत.मंदिराच्या उत्पन्नात याचा सहभाग असे. १९६५ नंतर मात्र परवाच कीर्तनाच्या सेवेचा प्रसाद या मंडळींना मिळू लागला.वै.हा.भ.प.शिरवळकर बुवा,आफळेबुवा,निजामपूरकर बुवा,पटवर्धन बुवा,कोपरकर बुवा,यांसारखी दिग्गज मंडळी यांनी येथे सेवा रुजू केली आहे.
 
१९२८ चा गणेशोत्सव,१९५२ चा महालक्ष्मी उत्सव हे ग्रामस्थानी सुरु केलेले उत्सव.समाजासाठी ते मंदिरात आले आणि इथेच स्थिरावले.आजही हे उत्सव मंदिरात साजरे होतात.आजची मंदिराची वास्तू दिसते ते १९५२ ला तयार झाली. यापूर्वी १९४० मध्ये मंदिराचा पहिला जीर्णोद्धार झाला.घुमत,गाभारा,चौसोपी वाडा असे याचे स्वरूप होते. चारी बाजूनी गॅलरीसारखी जागा, त्यात देवापुढे बंधुवर्ग व माडीवर महिलावर्ग श्रवणासाठी बसत असत.
 
२७ ऑक्टोबर १९५२ रोजी नव्या वास्तूची उदकशांत झाल्याची नोंद मंदिरातील कागदपत्रात वाचण्यास मिळते.आज या मंदिराचा कायापालट झाला आहे. हा कायापालट होताना मंदिराचे कार्यक्षेत्र केवळ धार्मिक,वैदिक इतके संकुचित मात्र राहिलेले नाही. मंदिराच्या कार्याची क्षितिजे नित्य रुंदावत आहेत. समाजातून येणारे लक्ष्मीरूपी धन समाजोपयोगी कार्यासाठी उपयोगात आणले पाहिजे. याचा धारणेने १९८५ ते १९९५ या काळात 'भारतीय संस्कृत दर्शन' हा आपल्या संस्कृतीची तोंडओळख करून देणारा अभिनव अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. पौराणिक ग्रंथ, उपनिषदे,वेद,शदशास्त्रे,भारतीय पाशात्य तत्वज्ञान,संतवाङ्मय ,ब्रह्मसूत्रे या साऱयांचा त्यात सामावेश होता. हे विद्यापीठ मंदिराने चालविले. मंदिराने सर्व सुविधा पुरविल्या;पण विद्यार्थ्याच्या अभावे हा चांगाला उपक्रम काळाच्या पडद्याआड गेला.
 
आज मंदिराने दुर्मिळ धार्मिक संदर्भग्रंथाचे अभ्यासिकेसह अद्ययावत वाचनालय अत्यल्प दारात ग्रामस्थाना दिले आहे. याचबरोबर ध्यानमंदिर,योग मार्गदर्शन यांसारख्या सुविधाही उदयास येऊन स्थिरावल्या आहेत. बदलत्या काळानुसार व्यसनमुक्ती केंद्र कुटुंबव्यवस्था टिकविण्यासाठी समुपदेशन या सेवा मंदिराने हाती घेतल्या आहेत.काळासोबत मंदिराचा वाढता व्याप,इतर देवदेवतांची स्थापना ,नित्यनैमित्तिक धार्मिक उत्सव,भक्तांची वाढती संख्या याचबरोबर दररोज जमा होणारी पाने,फुले, हार यांचे काय? ही नवी समस्याच निर्मण झाली.यातून खात प्रकल्प हा नवा उपक्रम सुरु करण्यात आला. या ठिकाणी उत्तम खात होऊ लागले. नर्सरीज,शेतकरी यांच्याकडून मागणी येऊ लागली.
 
अल्पदरात रुग्णवाहिका पुरविण्याची जबाबदारीही या गणरायाने घेतली.सोनोग्राफी सेंटर सुरु केले. गरजू,होतकरू,विद्यार्थ्यांना किंवा शैक्षणिक संस्थाना मदत केली.दहा वर्षांपासून साजरा होणारा माघी गणेशोत्सव ही भक्तांची मागणीही मंदिराने पुरविली आहे. थोडक्यात या गावाची गरज,लाड पुरविणारा श्रीगणेश याचे अधिष्ठान भरभक्कम आहे.श्रद्धा,भाव याने मंदिराचे वैभव वाढते आहे. गणेशाचे हे वैभव तो समाजपुरुषाला प्रसाद रूपाने नित्य देत आहे.

१९९८ पासून काही विश्वस्त व अन्य नागरिकांनी डोंबिवलीत नवर्ष स्वागत यात्रा सुरु केली.धर्म,पंथ,संप्रदाय यांच्या सीमारेषा पुसून मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ यात सामील झाले. पारम्पारिकतेचे विलोभनीय दर्शन,स्वयंशिस्त, सामाजिकतेचे भान याचे साक्षात दर्शन यात घडते.'बिंब जरी बालके एवढे परी त्रैलोक्या थोडके' या वचनानुसार हा उपक्रम सर्वानाच अनुकरणीय ठरला. उद्यान,कारंजे,रस्त्यावरील सौरदिवे,पर्यावरण सुधारणा, पर्ज्यन-वरुण यज्ञ अन्नदान, गो-दान,रक्तदान, धनदां,वस्त्रदान, अशा विविध दानांमुळे या देवस्थानाचा किर्तिरुपे परिमळ दरवळत आहे. उपासनेचा दृढ आश्रय मंदिराला आहे.नित्यनैमित्तिक वैदिक कार्यासह प्रासंगिक धार्मिक उत्सवही येथे साजरे होतात.सीमोल्लंघनासाठीही भाविक येथे येतात. भक्तांची अपार करुणा व प्रेम या मंदिरावर आहे.

"तुलसी कहे आपको निशिदिन जपीयो राम |
ते मानस माजुरी देत है,काही राखे राम " ||
माणसासारखा माणूससुद्धा कुणी मदत केली तर ती ठेवून घेत नाही. तसाच हा वरद गणेश भक्तांचे ठेऊन घेत नाही. ठेऊन घेतो फक्त प्रेममय भाव व निवांत श्रद्धा.बाकी सारे कृपारूपाने समाजाला भराभर देतो. 'धरणात इतिधर्म:' यानुसार हा समाजाची धारणा करतो.