ग्रामदैवत

काही गावे,शहरे,वास्तू अथवा मंदिरे यांना शेकडो वर्षांचा इतिहास असतो. परंतू डोंबिवली हे शंभरीच्या शतकात प्रवेश करणारे आणि ऐतिहासिक नसलेले पण इतिहास घडविणारे शार म्हणून नेहमीच चर्चेत असते.

धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात नवनवीन उपक्रम व प्रथा निर्माण करून सर्वदूर प्रस्थापित करणारे वयाची ९० वर्षे पार करणारे श्री गणेश मंदिर संस्थाना ही त्यास अपवाद नाही.अनेक मंदिरांची निर्मिती काही धनाढ्य व दानशूर व्यक्तींच्या दातृत्वातून झालेली असते. काही व्यक्तीना पदलेल्या सप्नातुन अथवा द्रुष्टांतातुन  मिळालेल्या प्रेरणेतुन काही मंदिरांची निर्मीती ज़ालेली बघावयास मिळते. परंतु आपल्या गणेश मंदिराची निर्मिती ही समाजिक भावनेतुन व व्यक्ती व्यक्तीच्या सामान्य दातृत्वातुन झालेली आहे.

साधारणपणे सन १९१५ च्या आसपास विविध सरकारी खात्यात नोकरी करणाऱ्या सुशिक्षित,मध्यमवर्गातील व्यक्ति आपल्या कुटुंबासहित डोंबिवलीत वास्तव्यास आल्या.कोणत्याही नवीन वसाहतीसाठी ग्रामदैवत ही मूलभूत गरज असते.ग्रामदैवता शिवाय गाव अपूर्ण आहे या जानवीतून मुंज,विवाह आणि शुभ कार्यास आशीर्वाद घेण्यासाठी ,तसेच धार्मिक सॅन,उत्सव,त्याबरोबरच सांस्कृतिक व सामाजिक जागृतीचे केंद्रस्थानी एकत्र येण्याचे स्थान म्हणून गणेशमंदिराच्या निर्मितीची योजना कार्यान्वित करण्याचे ग्रामसंस्थेच्या सभेमध्ये ठरले.सादर मंदिर उभारणीसाठी डेंग्यानद्वारे निधी उभा करणे,बांधकाम साहित्य जमा करणे,आवश्यक व सुयोग्य तंत्रज्ञ व कंत्राटदार नेमणे,बांधकामावर देखरेख करणे इ.कामे वाटून घेऊन मंदिर उभारणीची तयारी करण्यात आली.

कै.ढेकणे व कै..बक्षी यांनी क्र.९४ व क्र.९५ चे प्लॉट वाजवी किमतीत मंदिरासाठी दिले.कै.त्र्यं.रा.गाडगीळ,कै.शंकरराव दातार,कै.न.ग. अभ्यंकर,कै.नारायणराव गोरे,कै.शंकरराव लिखिते,इंजिनियर, कै..गोविंद सीताराम जोशी ,कै..केशवराव कानिटकर इ.मंडळींनी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडून मंदिराची उभारणी केली.वैशाख वाद्य ४ शके १८४६ (२९ मे 1924) या शुभदिनी श्री गणपती, श्री शंकर, श्री मारुती,श्री पार्वती व महालक्ष्मी या देवतांची स्थापना मोठ्या समारंभापूर्वक करण्यात आली.पुढे १९३३ साली कै.रावसाहेब आठवले यांनी त्यांचे वडील ब्रह्मभूत स्वामी आनंदयती यांचे स्मरणार्थ त्यांची समाधी बांधून त्यावर स्वखर्चाणे मंदिर बांधून दिले.

भगवंतावरील अढळ श्रद्धा,चारित्र,निरपेक्ष प्रामाणीक कष्ट यासह मंदिराच्या उभारणीसाठी स्वत:ला तन,मन,धन पूर्वक वाहून घेऊन या गणेशमंदिराच्या उभारणीसाठी अपार कष्ट घेतले व या ग्रामदैवताची मुहूर्तमेढ रोवली. त्या पायाभूत प्रथम विश्वस्तांचा परिचय करून घेणे रास्त ठरेल.कै. कृ.रा.निमकर हे "ऑफिस सी.डी." ससून मिल (हिंदू मिल) येथे जॉईंट कंपनी सेक्रेटरी म्हणून कामाला होते. ते पंचकमिटी सदस्य (कार्यकारिणी विश्वस्त) होते. डोंबिवलीत नळाचे पाणी आणण्याच्या कामात यांचा सिहांचा वाटा होता.त्रिंबक रामकृष्ण उर्फ नानासाहेब गाडगीळ यांनी मंदिर स्थापनेपासून मांदिरासाठीचा प्लॉट उपलब्ध करून त्याचे खरेदीखत यासह सरकारी आवश्यक ती सर्व कामे पार पाडणे इ. बाबतीत मोठे योगदान दिले. ते कस्टम ऑफिस मध्ये नोकरी करीत होते व अनेक वर्षे सरपंच होते. (पूर्वी गणेशमंदिराच्या अध्यक्षांना सरपंच ही संज्ञा होती व विश्वस्तांना पंच म्हणून संबोधिले जायचे) गणेशमंदिराबरोबरच ब्राह्मणसभेचे ते संस्थापक सदस्य होते. 

 कै.शंकर वामन उर्फ दादासाहेब दातार हे सेंट्रल रेल्वे मध्ये 'चीफ इंजिनियर ऑफिस' मध्ये हेडक्लार्क म्हणून कामाला होते,सुमारे वीस वर्षे मंदिराचे सरपंच होते.त्याचप्रमाणे त्यांचा ग्रामपंचायत, ब्राह्मणसभा,गोग्रासवाडी , पोस्ट ऑफिस इ.संस्थाच्या स्थापनेत सहभाग होता.कै.नारायणराव गोरे हे मंदिरात खजिनदार म्हणून जबाबदारी पहात होते.कै.मुकुंद विश्वनाथ कानिटकर यांनी "अकौंटस जनरल ऑफिस" गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मध्ये हेडक्लार्क म्हणून जवळ जवळ ४० वर्षे नोकरी केली. मंदिरामध्ये त्यांनी चिटणीस,खजिनदार व सरपंच म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या.कै.शंकराराव लिखिते हे मंदिरामध्ये खजिनदार म्हणून कार्यरत होते. खजिनदार म्हणून अतिशय चिखपणे जबाबदारी सांभाळली. तसेच पुजार्यासाठी निवासव्यवस्थेची योजना आखून त्याचा पाठपुरावा केला. कै.सदाशिव रावजी प्रधान हे मुंबई हायकोर्ट येथे सुपरिटेंडेंट म्हणून कार्यरत होते. विश्वस्त असताना त्यांनी खजिनदार म्हणून जबाबदारी सांभाळली. ते कायदेविषयक सल्लागार,उत्तम ज्योतिषी तसेच नाडी तज्ज्ञ होते.

कै.गणेश श्रीधर उर्फ भाऊसाहेब जोशी हे सेंट्रल रेल्वेत ऑडिट डिपार्टमेंट मध्ये नोकरीला होते.त्यांनी सेक्रेटरी व सरपंच पदाची धुरा सांभाळली. गणेश मंदिराव्यतिरिक्त ते डोंबिवली पिपल्स कन्झ्युमर संस्थेशी निगडीत होते. १९५२ मध्ये वीर सावरकर यांचा सत्कार करण्यात आला.त्यात त्यांचा विशेष सहभाग होता. वीर सावरकरांना आणण्या पासूनची व सत्काराची सर्व जबाबदारी त्यांचे कडेच होती.
जुन्या मंदिराच्या बाबतीतील अन्य मनोरंजक माहिती पुन्हा केव्हा तरी नक्कीच जाणून घेऊया.