विश्वस्त मंडळ

अध्यक्ष

श्री.राहुल वसंत दामले

समाजकारण व राजकारण या दोन्ही क्षेत्रात नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती म्हणून कार्यरत आहेत. श्री गणेशोत्सव मंडळाची धुरा अनेक वर्षे सांभाळत असणारे मंदिरातील विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घेतात.बांधकाम क्षेत्राचा अनुभव असल्याने मंदिराच्या वाढीव बांधकामाची जाबाबदारी आपल्या शिरावर घेऊन यशस्वीपणे पार पाडली.

संपर्क : ९७६९३१९९३३

उपाध्यक्ष

सौ.अलका दत्तात्रय मुतालिक

शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या सौ.अलकाताई अनेक संस्थात कार्यरत आहेत. अध्यात्मिक ग्रंथाचे अध्ययन व प्रवचने करतात. श्री गणेश मंदिरातील धार्मिक व महिलांच्या उपक्रमात या सक्रीय सहभागी होतात.

संपर्क : ९२२१४४०१४५

कार्यवाह

श्री. शिरीष विष्णू आपटे

गोदरेज कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यावर डेंटल इकवीपमेंट्स सर्व्हिसिंगचा व्यवसाय सुरु केला. पूर्वांचल विकास प्रकल्पाचे (नागालँड मुलांचे वसतिगृह) संस्थापक सदस्य. सध्या पालक म्हणून जाबाबदारी पार पाडतात.

संपर्क : ९८१९४५८५६७

सहकार्यवाह

श्री.निलेश शशिकांत सावंत

ठाणे जिल्ह्यातील एक धडाडीचे क्रीडापटू,डोंबिवली कल्याणमधील अनेक शैक्षणिक,सामाजिक,क्रीडा संस्थामध्ये कार्यरत. कबडडी असोसिएशन शिवाजी क्रीडा मंडळाचे पदाधिकारी. सामाजिक बांधिलकीचे भान असलेला सर्वसमावेशक कार्यकर्ता. श्री गणेश मंदिर संस्थानाशी २० वर्षांपासून संबंधित व कार्य.

संपर्क : ९८७०३४२७२४

कोषाध्यक्ष

सी.ए.सुहास सुधाकर आंबेकर

यशस्वी चार्टर्ड अकाउंटंट व विविध संस्थाशी निगडीत. कल्याण डोंबिवली ब्रॅन्च ऑफ डब्लू आय आर सी च्या मॅनेजिंग कमिटीचे सदस्य. विविध बँकांच्या लेखापाल समितीवर सदस्य.

संपर्क : ९८२०१५८२६८

विश्वस्त

श्री.अच्युत मधुसूदन कऱ्हाडकर

बँकिंग क्षेत्रात नव्याचा ध्यास, या कार्याचा प्रदीर्घ अनुभव, यासाठी सतत प्रवास असे त्यांचे व्यावसायिक क्षेत्र तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सामाजिक कार्य अनेक वर्षं करत आहेत. अनेक वर्षं श्री गणेश मंदिर संस्थानाच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे पेलणारे हे व्यकिमत्व.

संपर्क : ९८६७२९७६८२

विश्वस्त

श्री.प्रविण वसंत दुधे

काजागी उद्योजक असणारे श्री. दुधे समाजातील विविध स्तरातील संस्थात सक्रीय कार्यरत आहेत. समाजातील दुर्बल घटकांची सेवा हे व्रत त्यांनी अंगिकारले आहे. श्री गणेश मंदिर संस्थानाचे कोषाध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची धुरा त्यांनी समर्थपणे पेलली आहे.

संपर्क : ९८२०१८३४१५

विश्वस्त

डॉ.अरुण अनंत नाटेकर

१९७८ पासून डोंबिवलीत दन्त चिकित्सक म्हणून व्यवसाय करीत आहेत. कर्हाडे ब्राह्मण सेवा मंडळाचे अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत. १९८९ पासून इंडियन डेंटल असोसिएशन महाराष्ट्र व डोंबिवली शाखा येथे विविध पदावर काम करण्याचा अनुभव.

संपर्क : ८०८०२८१९७८

विश्वस्त

सौ.गौरी सदाशिव खुंटे

विश्व हिंदू परिषदेचे गेल्या २६ वर्षांपासून काम करतात तसेच सध्या कल्याण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पहातात.विश्व हिंदू परिषदेचे बदलापूर जवळील सोनावळे येथील "स्वस्त्री न्यास आश्रम - अनाथ बालकाश्रम" इथे गेल्या १० वर्षांपासून विश्वस्त.तसेच विश्व हिंदू परिषदेच्या अंतर्गत पौरोहित्य वर्ग गेल्या १५ वर्षांपासून घेतात.सगळ्या प्रकारचे धार्मिक कार्यक्रम (पूजा,शांती,याग) करतात.विशेषतः "परावर्तन" - परधर्मात गेलेल्याना परत आपल्या धर्मात घेण्याचे महत्वपूर्ण काम करतात. नववर्ष स्वागत यात्रेचे काम पहिल्या वर्षांपासून करतात तसेच श्री गणेश मंदिर संस्थानातील धार्मिक समिती सदस्य म्हणून बरीच वर्षे जबाबदारी पार पाडली आहे.

संपर्क : ९९२००२८७६४

विश्वस्त

श्री.राजय विश्वनाथ कानिटकर

पोळी भाजी गृहउद्योगाचे आद्यप्रवर्तक असलेले कानिटकर समाजकारणाशी संबंधित संस्थानचे सल्लागार व वेळोवेळी मदतीचा हात पुढे करणारे म्हणून ओळखले जातात.

संपर्क : ९८२१७३५५५२

विश्वस्त

श्री.मंदार श्रीकांत हळबे

राजकारण व समाजसेवेची आवड असणारे श्री. हळबे हे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते म्हूणन कार्यरत आहेत. समाजातील विविध घटकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी ते सतत तत्पर असतात.

संपर्क : ९५९४५१५९९९