उपक्रम

धार्मिक उपक्रम :-

 

मंदिरातील देवदेवतांचे उत्सव :-

 • श्री गणेशाची नित्यपुजा व काकड आरती सकाळी ५.३० वा. संपन्न होत असुन संकष्ट चतुर्थीला भक्तांचे संकल्प अभिषेक केले जातात. सण उत्सवाप्रमाणे इतर देवदेवतांचे अभिषेक ही केले जातात.विशेष उत्सव अंगारकी चतुर्थी प्रसंगी गर्दीचे नियमन विशेष काळजीने केले जाते. त्यासाठी विशेष व्यवस्था करुन भक्तांची गैरसोय टाळ्ली जाते. विशेष म्हणजे एस.एम.एस द्वारे भक्तांना अभिषेकाची माहिती दिली जाते.
 • वर्षभर समस्त भक्तांच्यावतीने दररोज सकाळी मंदिरातील सर्व देव-देवतांचे दैनंदिन अभिषेक,लघुरुद्र,सहस्रावर्तने,संकल्प पूजा ब्राह्मण वृन्दाद्वारे करण्यात येतात.संकष्टी चतुर्थी,अंगारकी, महाशिवरात्री,श्रावणी सोमवार,श्रावणी शनिवार तसेच विविध सणांचे दिवशीही विशेष अभिषेक करण्यात येतात.
 • प्रत्येक एकादशीस विष्णुसहस्रनाम, गीता पठण केले जाते. मंदिरात दररोज दुपारी ४.०० ते ६.३० या वेळेत नामांकीत प्रवचनकार,कीर्तनकारांचेद्वारे कीर्तन/प्रवचनाचे आयोजन केले जाते.नव्या वास्तूतील ध्यानकक्षाचा लाभ भक्त मंडळी सातत्याने घेत आहेत,त्यांच्या उपासनेसाठी योग्य वातावरणाचा अनुभव येत आल्याने भक्त समाधान व्यक्त करतात.

वैद्यकीय उपक्रम :-

 • मंदिरातर्फे चालवण्यात येणार्या श्री गणेश अल्ट्रासोनोग्राफी सेंटर मध्यी माफक दरात Full Abdoment,Pelvis,Orbit,Serotum,Follicular Study,KUB/Upper Abdomen,Obstetric Neck ह्या प्रकारच्या सोनोग्राफी चिकित्सा करण्यात येतात. डॉ.भावना थोरात यांचे बहुमोल सहकार्य मिळत आहे. अहवाल वर्षात ६५०० गरजु व्यक्तींनी केंद्रातील सेवेचा लाभ घेतला. आपल्या केंद्राच्या रिपोर्टना सर्वत्र मान्यता आहे. मंदिर परिसरात मंदिराद्वारे तसेच इतर संस्थांच्या माध्यमातुन 'रक्तदान' शिबारांचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांचे उत्तम सहकार्य मिळाले.
 

वैद्यकीय सहाय्य :-

 • श्हर परिसरात आर्थिक द्रूष्ट्या कमकुवत रुग्णांना आर्थिक मदत केली जाते. २०१६-१७ ह्या वर्षात रुपये ५,७६,५००/- एवढी रक्क्म अदा करण्यात आली. ह्या उपक्रमासाठी अनेक भक्तांचे सहकार्य लाभ आहे. ही मदत डोम्बिवलीकरांना जात,धर्म,न पाहता मानवतेच्या द्रुष्टीने केली जाते.

सामाजिक उपक्रम :-

दुष्काळग्रस्त सहाय्यक सेवा :-

 • श्री गणेश मंदिर संस्थानातर्फे हाती घेण्यात आलेल्या दुष्काळ निवारणार्थ कामांपैकी,सातारा जिल्ह्यातील जाखणगांव दहीवडी येथील श्रमदानाने पूर्ण करण्यात आलेल्या बंधारा दुरुस्ती कामासाठी अंदाजे रु.२,२१,६५४.०० चा कच्चा माल आपण पुरविला,संबंधित कामे पुर्ण झाल्याने गावकर्यानी समाधान व्यक्त केले.
 

निर्माल्य खत प्रकल्प :-

 • एम.आय,डी.सी. फेज १, डोंबिवली येथे मंदिरातर्फे सुरु असलेल्या खत प्रकल्पाच्या नुतनीकरणा नंतर चांगल्या प्रमाणात खत निर्मिती होत आहे. २०१६-१७ ह्या वर्षात ५७४० किलो शास्त्रशुध्द पध्दतीने बनविलेले नैसर्गिक गांडुळखत नाममात्र भावात नागरिकांसाठी मंदिरात उपलब्ध झाले. बागा,नर्सरी व घरगुती फुलझाडांसाठी मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञान पध्द्तीचे निर्माल्य क्रशर मशीन घेण्यात आले. त्याने निर्माल्य खत प्रक्रिया लवकर होते. निर्माल्यद्वारे खाडी किनारी,विहिरीत होणारे प्रदूषण टाळण्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणुन 'ग़ांडूळ्खत' प्रकल्पाकडे बघितले जाते. हा प्रकल्प संपूर्ण नैसर्गिकरित्या शास्त्रशुध्द पध्द्तीने चालविला जात आहे.मंदिरातील दैनंदिन निर्माल्य व नागरिकांकडुन येणारे निर्माल्य हे दररोज मंदिरामध्ये गोळा केले जाते. विशेष म्हणजे अनेक शाळेचे विद्यार्थी पर्यावरणाचा प्रत्यक्ष अभ्यास करणेसाठी खत प्रकल्पास भेट देत आहेत.
 

श्री गणेश वाटिका  :-

 • श्री गणेश मंदिरालगत महापालिकेकडून मिळालेल्या भूखंडावर ज्येष्ठ नागरिक समाधानाने विसावा घेतात तसेच तेथे जेष्ठांचे अनेक कार्यक्रम संपन्न होत असुन ते समाधानी आहेत. तसेच गणेश वाटिकेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिंकासाठी ओपन जीमची यंत्रसामग्री बसविण्यात आली आहे. त्याचा ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपयोग करीत आहेत. 
 

अद्ययावत सभागृहे  (ओंकार,वरद,विनायक,वक्रतुंड,लंबोदर) :-

 • शहरातील लहान मोठ्या सामाजिक,सांस्क्रुतिक,शैक्षणिक, धार्मिक,अध्यात्मिक,वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तिने काम करणार्या संस्थांना उत्तम प्रकारची विविध क्षमतेची (२५ ते ३००) अद्ययावत व सर्व सोयींसह पाच सभागृहे उपलब्ध केली असून वर्षभरात अनेक संस्था षहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नेटक्या सभागृहात आपले उपक्रम करीत आहेत.  संस्थांनतर्फे सामाजिक,धार्मिक कार्य करणार्या संस्थाना आर्थिक अनुदान दिले जाते. २०१६-१७ वर्षात संस्थांना रु.१,७४,५००.०० एवढे अनुदान देण्यात आले.

शैक्षणिक उपक्रम :-

 • डोंबिवली परिसरातील शालेय व महाविद्यालयीन गरजू, हुशार व गरीब विद्यार्थाना शैक्षणिक मदती संबंधात अर्ज मागविले होते. इयत्ता पहिली ते दहावी च्या ७११ विद्यार्थ्याना रु.५,३५,८००.०० व महाविद्यालयीन तसेच पदव्युत्तर शिक्षण घेणार्या ५० विद्यार्थ्याना रु.१,५३,३००.०० एवढे आर्थिक सहाय्य श्री गणेशाचा प्रसाद म्हणून देण्यात आले.वर्षभर मंदिराचे संयुक्त विद्यमाने सकाळी योगवर्ग, सायंकाळी तत्वज्ञान,ज्योतिष, संस्कृत तसेच गीता पठणाचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. दैनंदिन उपक्रम,विशेष कार्यक्रम, याच बरोबर आध्यात्मिक विषयांची ओळख,दैनंदिन महत्वाचे कार्यक्रम, व्यक्तिगत विकासासाठी आवध्यक माहिती "ग्रामदैवत" ह्या त्रैमासिकाद्वारे देत असतो.
 • ७ एप्रिल १६ रोजी अति.पोलिस महासंचालक,महाराष्ट्र,मा.श्री.व्ही.व्ही.लक्ष्मीनारायण ह्यांचे हस्ते संगणीक्रूत वाचनालयाचा शुभारंभ करण्यात आला. टिळक रोड,डोंबिवली (पू) येथील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून प्र.के.अत्रे ग्रंथालय- वाचनालय श्री गणेश मंदिर संस्थानकडे. ३० वर्षांच्या मुदतीवर मिळाले आहे. मासिक व पुस्तक विभागातील एकूण सभासद संख्या ४५२८ आहे.धार्मिक, ज्योतिष तसेच धार्मिक साहित्य संदर्भात सुमारे २७०० पुस्तके धार्मिक ग्रंथालयात नागरिकांसाठी उपलब्ध आहे. त्याचा लाभ अनेक अभ्यासू आपल्या संशोधन,लिखाण,ग्रंथासाठी संदर्भ घेत आहेत.द्रूष्टीहीन व्यक्तिंसाठी ध्वनिमुद्रित पुस्तकालय,सभासद संख्या १६३  विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अभ्यासिकेचा ७९० विद्यार्थी लाभ घेत आहेत.मोफत वृत्तपत्र वाचनालायात दररोज ४० वृत्तपत्रे  येत असून दररोज २००-२२५ नागरिक वाचन करतात. ( वेळ स.८ ते रात्रौ ८ वा.पर्यंत).
 • सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थांसाठी  अद्ययावत मोऱया सभागृह उपलब्ध. ज्येष्ठ नागरिक व सर्वसाधारण गृहिणींसाठी बेसिक कॉम्पुटर प्रशिक्षण केंद्रात १० संगणक उपलब्ध आहेत. स.८ ते रात्रौ ८ वा. पर्यंत बेसिक कॉम्पुटर प्रशिक्षण सुरु करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांचा ३२० प्रशिक्षणांर्थीनी लाभ घेतला.ह्या उपक्रमासाठी केळकर इन्स्टिटयूट चे विशेष सहकार्य लाभले आहे.चेंबर ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज च्या सहकार्याने कॉमर्स क्षेत्रातील तरुणांसाठी विनामूल्य Tallअकौंटस, जी.एस.टी.  प्रक्षिक्षण सुरु करण्यात आले असुन ह्या ठिकाणी १० संगणक कार्यरत आहेत. ह्या उपक्रमास एल अँड टी इन्फोटेक चे विशेष सहकार्य प्राप्त झाले आहे.दिवाळी शंका वाचा योजनेत नागरिकांसाठी सुमारे १२०० अंक वाचकांसाठी उपलब्ध होते.तत्पर सेवा, अद्ययावत सुविधा ,जनरेटर ,लिफ्ट सेवा उपलब्ध असल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

सांस्कृतिक उपक्रम :-

युवाभक्ती दिन :-

 • दिवाळीच्या पहिल्या दिवशी श्री गणेशाचे दर्शन घेऊन एकमेकांना शुभेच्छा देणार्या हजारो युवक युवतींच्या कलागुणांचा कलाविष्कार करण्याकरिता दि.२९.१०.२०१६ रोजी 'युवाभक्ती शक्ती दिन'हा कार्यक्रम सादर केला गेला. विषय भारतीय लोककला. सदरहू उपक्रमास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.   
 

रविवारीय संगीत सेवा :-

 • नवोदितांसाठी ग्रामदैवतेच्या चरणी सेवा अर्पण करण्यासाठी उपलब्ध असलेले व्यासपीठ व अनेक दिग्गज नामवंत कलाकारांचे श्रध्दास्थान ठरलेला हा रविवारीय संगीत सेवेचा उपक्रम गेली ३७ वर्षे सुरु असुन २०१६-१७ मध्ये ५५ (विशेष कार्यक्रमासह) कार्यक्रम सादर झाले.संगीतसेवेच्या वर्धापन दिनानिमित्त दि.१२.०३.२०१७ रोजी सुप्रसिध्द गायक श्री.विनायक जोशी (डोंबिवली) यांनी सायं. ५ ते ७ या वेळेत मराठी भावागीतांची वाटचाल हा गायनाचा कार्यक्रम सादर केला. अभिजात संगीताने कार्यक्रमास बहार आला. उपस्थित श्रोत्यांनी वाहवा केली.
 

ढोल / लेझीम / झांज पथक :-

 • श्री गणेश मंदिर संस्थानच्या युवा मंडळीचे ढोल / लेझिम / ध्वज पथक डॉ.विनय वेलणकर यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत असून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन श्री. आनंद अंबर्डेकर व सहकारी करीत आहेत. शिस्तबध्दता,नाविन्य हे वैशिष्ठ्य स्वागत यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरत असुन सध्या ढोल पथकात ५०,ध्वज पथकात ३५ व लेझिम पथकात ४० सदस्य आहेत.ठाणे ते अंबरनाथ परिसरातील इच्छुक लेझिम-ढोल-झांज प्रशिक्षण शिबिरान्मध्ये सहभागी होत असतात.नवनविन रेखीव / आखीव रचनांमुळे ही पथके  संपूर्ण महाराष्ट्रात अभिनव म्हणून ओळखली जात आहेत. वैशिष्ट्य म्हणजे उच्चशिक्षित व व्यावसायिक तरुण / तरुणी बहुसंख्य असून तरुणांचा वाढता प्रतिसाद आहे. यंदा अनेक स्पर्धेत तरुणांनी पारितोषिके पटकावली त्यांचे अभिनंदन.

नववर्ष स्वागत यात्रा :-

 
 • श्री गणेश मंदिर संस्थान व नववर्ष स्वागत यात्रा समिती डोंबिवली यांचे विद्यमाने यंदाही नववर्षाचे स्वागत करणेसाठी गुढीपाडवा २८ मार्च २०१७ रोजी जल्लोषात नववर्ष स्वागत यात्रा संपन्न झाली.स्वागतयात्रेचे यंदाचे हे १९वे वर्ष होते. प्रतिवर्षी आपण अभिनव लोकोपयोगी योजना राबवतो. यंदा भविष्याचा वेध घेणारी डोंबिवली ह्या संकल्पनेवर विविध कार्यक्रम शहरात निरनिराळ्या संस्थाच्या सहकार्याने राबविण्यात आले. मूळ विषयाबरोबर कैटुंबिक,सामाजिक,शैक्षणिक महिला सुरक्षा,पर्यावरण,प्लास्टिक मुक्ती, इ.विषय हाताळण्यात आले.
 • शहाराचे विविध भागात श्री गणेश अथर्वशीर्ष पठण व उपासना संपन्न झाल्या.त्यात श्री गोंदवलेकर महाराज उपासना केंद्र,शाकंभरी मंदिर, ज्ञानेश्वर कार्यालय, दत्तमंदिर,मार्केंडेय मंदिर, ह्यांचा उल्लीखा करावा लागेल.संपूर्ण शहर भक्तीमय झाले होते. नववर्ष स्वागत यात्रे प्रित्यर्थ २१ मार्च २०१७ रोजी श्री गणेश अथर्वशीर्ष पठाण,२३ मार्च रोजी बहुभाषिक भजने,२४ मार्च रोजी श्रीसूक्त पठण करण्यात आले.यंदा मंदिराचे दोन्ही प्रवेशद्वारासमोर कायमस्वरूपी दीपमाळ उभारण्यात आली. सर्व कार्यक्रमास मंदिर गर्दीने गच्च भरून लोक रस्त्यावर उभे होते. सामाजिक प्रबोधन व्हावे म्हणून दि.२६ मार्च रोजी सुप्रसिद्ध राशिचक्रकार श्री. शरद उपाध्ये यांचा नागरी सत्कार करण्यात आला.त्यांनी रंजक पण प्रबोधनपर विवेचन केले. सुमारे २००० नागरिक उपस्थित होते.
 • नववर्ष स्वागत यात्रे निमित्त सहाभागे संस्थानी विविध कार्यक्रम स्पर्धा आयोजित केल्या त्यात संस्कार भारतीची वि.दा.सावरकरांची रांगोळी विशेष उल्लेखनीय होती.दि.२७ मार्च २०१७ रोजी पूर्व संस्थेला संभाजी महाराज बलीदिना निमित्त शारीरिक कसरतीचे कार्यक्रम झाले.त्यात ढोल,लेझिम,शिख व आदिवासी बांधवांचे कार्यक्रम वाहवा मिळवून गेले.श्री. रविंद्रजी भुसारी (प्रांतचालक,भा.जा.पा.) यांची उपस्थिती हे उललेखनीय बाब होती.
 • २८ मार्च २०१७ रोजी पहाटे श्रींची महापूजा श्री.रामजी वैद्य यांचे शुभहस्ते होऊन श्री.अच्युतराव कऱ्हाडकर व श्री.वैद्य यांनी पालखी पूजन केल्यावर श्री. करंदीकर शास्त्री यांनी पंचाग वाचा केले. सकाळी ठीक ७ वा. हजारो स्त्री, पुरुष ढोल,लेझिम, झांज, नृत्यपथके यासह मिरवणूक निघून ठीक ११ वा. आप्पा दातार चौकात यात्रेची सांगता झाली. यंदा पालखीचे सांगत मुस्लिम बांधवांनी करून ऐक्याचा नवा वास्तुपाठ घालून दिला.प्रत्यक्ष स्वागत यात्रेत १७० संस्था, सुमारे ७५ चित्ररथ सहभागी होते. संस्थानचे विश्वस्त व संयोजन समितीने सहभागी संस्थाना शी प्रसाद देऊन धन्यवाद दिले.
दिनांक उत्सव
२१/०१/२०१८ (रविवार) श्री गणेश जयंती उत्सव (माघ शु ४)
 • सकाळी ५ वा महापूजा
 • सकाळी ७ ते १०.३० वा गणेश याग
 • सकाळी १०.३० ते १२.३० वा गणेश जन्माचे कीर्तन
 • रविवारीय संगीत सेवा - वर्धापन दिन
   
१३/०२/२०१८ (मंगळवार) महाशिवरात्री शिवपूजन रात्री १२.२८ ते १.१८ वा (माघ शु १३) निशिथकाल
   
०१/०३/२०१८ (गुरुवार) हुताशनी पौर्णिमा (फाल्गुन १५) होळी सायं ७ वा.
   
१८/०३/२०१८ (रविवार) गुढीपाडवा
 • सकाळी ५ वा गणेश महापूजा
 • सकाळी ५.३० वा पंचांग वाचन
 • सकाळी ६ वा पालखी
 • गुढी उभारणे पूजन
 • श्री राम नाम जप आरंभ
   
२५/०३/२०१८ (रविवार) श्री रामनवमी जन्म उत्सव
 • सकाळी ६.३० वा महापूजा
 • सकाळी १० ते १२.३० वा राम जन्म कीर्तन
 • सायं ६ वा राम नाम जप समाप्ती
   
३१/०३/२०१८ (शनिवार) हनुमान जयंती उत्सव
 • सकाळी ५ वा हनुमान महापूजा
 • सकाळी ५.१५ वा हनुमान जन्माचे कीर्तन
   
०३/०४/२०१८ (मंगळवार) अंगारकी चतुर्थी
 • सकाळी गणेशाची पुजा (सहस्त्रावर्तन)
   
०३/०५/२०१८ (गुरुवार) श्री गणेश मंदिर वर्धापन दिन (वैशाख कृष्ण ४)
 • श्री गणेश महापूजा, गणेश याग
   
१६/०५/२०१८ (बुधवार) गंगा दशहरा (अधिक जेष्ठ प्रतिपदा)
 • शसकाळी ८.३० ते ११ वा दशहरा निम्मित कीर्तन
 • १६/०५/२०१८ ते २४/०५/२०१८ दशहरा समाप्ती जेष्ठ शु. १०
 • अधिक महिना प्रित्यर्थ विष्णु याग
   
२७/०६/२०१८ (बुधवार) वटपौर्णिमा (निज जेष्ठ)
   
२३/०७/२०१८ (सोमवार) सकाळी ७ वा. श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजा (आषाढी एकादशी)
   
३१/०७/२०१८ (मंगळवार) अंगारकी संकष्टी चतुर्थी
 • गणेश महापूजा
   
१२/०८/२०१८ (रविवार) श्री सत्यनारायण महापूजा सामुदायिक (श्रावण शुक्ल प्रतिपदा)
   
१९/०८/२०१८ (रविवार) श्री सत्यनारायण महापूजा सामुदायिक (श्रावण शुक्ल ९)
   
२६/०८/२०१८ (रविवार) श्री सत्यनारायण महापूजा सामुदायिक (श्रावण शु. १५)
   
०२/०९/२०१८ (रविवार) श्री कृष्ण जयंती
 • सकाळी ७ वा श्री कृष्ण महापूजा
 • सकाळी ८ वा श्री सत्यनारायण महापूजा
 • सकाळी १० ते १२.३० वा श्री कृष्ण जन्माचे कीर्तन
   
१३/०९/२०१८ (गुरुवार) श्री गणेश चतुर्थी उत्सव (भाद्रपद शु. ४)
   
१८/०९/२०१८ (मंगळवार) दु. ४ ते ५.३० वा गोकर्ण महात्म्य वाचन (भाद्रपद शु. १०)
   
१९/०९/२०१८ (बुधवार) भागवत सप्ताहरंभ
 • सकाळी ८ ते १०.३० वा संहिता वाचन
 • दु. ३ ते ६ वा निरुपण
   
२०/०९/२०१८ (गुरुवार) गणेश विसर्जन (भाद्रपद शु. ११)
   
२५/०९/२०१८ (मंगळवार) भागवत साप्ताह समाप्ती (भाद्रपद शु. १५ पौर्णिमा)
   
२६/०९/१८ ते ०८/१०/२०१८ भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते अमावस्या
   
१०/१०/२०१८ ते १८/१०/२०१८ नवरात्र उत्सव (अश्विन १/२)
 • घटस्थापना नवरात्र आरंभ
 • श्री देवी महापूजा घटस्थापना पूजन
 • शसप्तशांती पाठ पठण
   
१२/१०/२०१८ (शुक्रवार) विनायक चतुर्थी
   
१३/१०/२०१८ (शनिवार) ललिता पंचमी - श्री सूक्त पठण
   
१६/१०/२०१८ (मंगळवार) महालक्ष्मी पूजन (अश्विन शु. ७)
 • घागरी फुंकणे (अष्टमी उत्सव)
   
१७/१०/२०१८ (बुधवार) सकाळी ७ ते १२.३० वा नवचंडी याग (अश्विन शु. ९)
 • सायं. ५ वा. दसरा शमी पूजन
   
२४/१०/२०१८ (बुधवार) सकाळी ५.३० ते ७ वा. काकड आरती आरंभ (अश्विन शु. १५)
   
०४/११/२०१८ (रविवार) एकादशी सायं.५.३० वा., गोवत्स वसुबारस पूजन (अश्विन कृ. १२)
   
०५/११/२०१८ (सोमवार) धनत्रयोदशी
   
०६/११/२०१८ (मंगळवार) नरक चतुर्दशी अभ्यंगस्नान
 • युवा शक्ती दिन
   
०७/११/२०१८ (बुधवार) सायं. ५ वा लक्ष्मी पूजन (अश्विन कृ. ३०)
   
०८/११/२०१८ (गुरुवार) दिवाळी पाडवा (अन्नकोट) गोवर्धन पूजन
   
१९/११/२०१८ (सोमवार) कार्तिक एकादशी
   
२०/११/२०१८ (मंगळवार) सायं ५ ते ६ वा तुलसी विवाहारंभ
   
२२/११/२०१८ (गुरुवार) त्रिपुरारी पौर्णिमा सायं ५.३० वा. दीपोत्सव
   
१४/१२/२०१८ (शुक्रवार) श्री गुरुचरित्र साप्तारंभ (मार्गशीष शु. ७)
 • सकाळी ८ ते ११ वा पारायण वाचन
 • दुपारी ३ ते ६ वा निरुपण
   
२१/१२/२०१८ (शुक्रवार) श्री गुरुचरित्र समाप्ती
   
२२/१२/२०१८ (शनिवार) श्री दत्त जयंती (मार्गशीष शु. १५)
 • सकाळी ६ वा. श्री गुरु दत्ताची महापूजा
 • सकाळी ८ वा. श्री दत्त याग
 • दुपारी १२ वा पूर्णाहूती
 • दत्त जन्म कीर्तन
 
दिनांक उत्सव
०८/०२/२०१९ (शुक्रवार) श्री गणेश जयंती (माघ शुक्ल ३/४)
 • श्री गणेश महापूजा
 • श्री गणेश याग
 • श्री गणेश जन्म कीर्तन
   
०४/०३/२०१९ (सोमवार) शमहाशिवरात्री (माघ कृ. १३) मध्यरात्री १२.४६ ते १.१५ वाी
   
२०/०३/२०१९ (बुधवार) हुताशनी पौर्णिमा होळी (फाल्गुन शु. १५)
   
०६/०४/२०१९ (शनिवार) चैत्र शु. प्रतिपदा